चर्चेचा विषय ठरत आहे भिंत-दरवाजा नसलेले बाथरूम


ट्विटरवर लोक वाद घालत असतात, स्वतःचे मत मांडत असतात. पण काही वेळेस लोक असे विचित्र फोटो अथवा व्हिडीओ शेअर करतात की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित होतात. असाच एक फोटो ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. बिना भिंतीच्या बाथरूमचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


डेबरा नावाच्या ट्विटर युजर्सने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिना भिंतीचे बाथरूम दिसत आहे. बाथरूममध्ये बाथटब, दोन बेसिन्स आणि शॉवर देखील आहे. तसेच, त्यात शौचासाठी कमोड देखील आहे. या बाथरूमाल एकही दरवाजा नाही की भिंत नाही.


डेबराने फोटो शेअर करताना लिहिले की, बिना भितींचे बाथरूम. घराच्या मालकाने सांगितले की, कपल्सला असेच बाथरूम हवे आहे.


हा फोटो बघून ट्विटरवर अनेकांनी मजेशीर कमेंट दिल्या.
https://twitter.com/RhondaWoman/status/1139438689853952000
मात्र घराचे मालक असलेले ट्रॉय विलियम्सन म्हणाले की, अनेक लोकांचा माझ्यावर विश्वास नाही. पण हे असेच आहे.  नवरा बायोसाठी वेगवेगळे बेसिन्स आहेत. दोन शॉवर आहेत, मला हे असेच हवे होते. संपुर्ण मोकळे.

Leave a Comment