पायावर पाय टाकून बसता? मग हे नक्कीच वाचा


बहुसंख्य लोकांना खुर्चीवर, सोफ्यावर बसताना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. घरात, कार्यालयात, हॉटेल, रेस्टॉरंट, थियेटर असे कुठेही बसण्याची वेळ आली कि खूप लोक पायावर पाय टाकून बसतात. ही पोझ बसणाऱ्या व्यक्तीला आरामदायी वाटत असली तरी शरीरासाठी मात्र ती अतिशय नुकसानदायी ठरू शकते. पायावर पाय टाकून बसण्याचे काय परिणाम होतात हे त्यासाठी जाणून घेणे आवश्यक आहे.

पायावर पाय टाकून बसल्याने पायाकडून हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे तो पुन्हा पायांकडे पाठविण्यासाठी हृदयाला अधिक जोराने काम करावे लागते परिणामी रक्तदाब वाढतो. अर्थ्रो फ़िजिओथेरपी तज्ञ सांगतात, एकावर एक पाय टाकून बसण्याने पाठ, मान दुखू शकते. पाठीच्या कण्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब येतो त्यामुळे बॅलन्स बिघडतो. बराच काळ या स्थितीत बसले तर स्पॉंडीलायटीस होतो आणि मानेचे दुखणे सुरु होते. मानेची नस कमरेशी जोडलेली आहे त्यामुळे पायावर पाय टाकल्याने या नसा दाबतात.


आपल्या पायांच्या गुडघ्यामागे पेरॉलियन नावाची नर्व्ह असते. पायावर पाय टाकून बसल्याने गुडघ्याच्या मागे दाब येऊन ही नर्व्ह दबली जाते आणि पाय आखडणे, पायाला मुंग्या येणे, लचक भरणे, व्हेरिकोज व्हेन्स येणे अश्या समस्या येतात. पाय सुजतात, पायांच्या वेदना वाढतात. पायावर पाय टाकून बसण्याने जांघेतील मांसपेशीवर जोर पडतो त्यामुळे सांधे दुखणे, हाडे सरकणे, एकमेकांवर चढणे असे त्रास होऊ शकतात. कंबर आणि पायाच्या मांसपेशी ताणल्या जातात आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे चालणे, उठणे, बसणे या सारख्या साध्या हालचाली सुद्धा अडचणीच्या होतात.

गर्भवती महिला पायावर पाय टाकून बसत असतील तर त्यामुळे त्याच्या पोटावर दाब येतो. परिणामी पोटात बाळाच्या हालचालींवर परिणाम होतो. यामुळे बाळंतपण होताना त्रास होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment