तालीबान्यांचे सुपरमार्केट

अफगाणिस्थानवर तालिबानने काबू केल्यावर केवळ देशाची परिस्थितीच नाही तर बाजारातील वस्तू स्टॉक मध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येत आहे. काबुल मध्ये अमेरिकेने प्रथम सैन्य पाठविले तेव्हा म्हणजे २००१ साली एक सुपर मार्केट सुरु झाले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नावावरून या मार्केटचे नामकरण बुश बाजार असे केले गेले होते. या बाजाराचे स्वरूप सुद्धा तालिबानी कब्जानंतर पूर्ण बदलले आहे.

द. सनच्या रिपोर्टनुसार हा बाजार पूर्वी खास सैनिकी बुटांसाठी प्रसिद्ध होता. या बाजारात पूर्वी अमेरिकन सैनिकांची गर्दी असे. पण आता ते देश सोडून गेले आहेत. या बाजारात काळ्या बाजारात आता नाईटव्हिजन गॉगल, अमेरिकेने अफगाणिस्तानला भेट दिलेले लेजर साईट्स टॉर्च, पाच लाख बंदुका उपलब्ध आहेत. नाईट व्हिजन गॉगल १६ हजारात विकले जात आहेत..

येथील दुकानदार सांगतात, आता या बाजारात तालिबानीच अधिक येतात आणि सर्वच दुकानदार त्यांना घाबरतात. न आवडलेल्या वस्तू ते लगेच फोडून टाकतात. वाद्ये तर लगेच फोडली जातात. या बाजाराचे नाव सुद्धा तालिबानीनी बदलून टाकले आहे.