सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव अनंतात विलीन


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी निधन झाले आहे. सिद्धार्थचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सिद्धार्थवर आज अंत्यसंस्कार पार पडले आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला धक्का बसला आहे. तर त्याच्यावर ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले आहे.

शेहनाज सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी ओशिवारा स्मशानभूमित पोहोचली होती. यावेळी शेहनाजसोबत तिचा भाऊ होता. शेहनाज तिच्या गाडीत रडताना दिसली. तिचे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे शेहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील ओशिवारा स्मशानभूमीत हजेरी लावली होती.

शेहनाज व्यतिरिक्त सिद्धार्थच्या संपूर्ण कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. तर या आधी शेहनाजच्या वडिलांनी ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सिद्धार्थने शेहनाजच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला आहे. तर सिद्धार्थ आता या जगात नाही, यावर शेहनाजचा विश्वासच बसत नाही आहे.