आयर्लंडमध्ये व्हॉटस अपला १९५० कोटींचा दंड

आयर्लंड प्रायव्हसी वॉचडॉग ने युरोपीय संघातर्फे करण्यात आलेल्या एका तपासानंतर व्हॉटस अप ला विक्रमी २२.५ कोटी युरो म्हणजे १९५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. या तपासात फेसबुक व अन्य कंपन्यांबरोबर लोकांचा डेटा शेअर करण्याबाबत व्हॉटस अप कडून युरोपिय संघाच्या डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. डेटा संरक्षण आयोगाने गुरुवारी या संदर्भात व्हॉटस अपला डेटा संस्करण प्रक्रिया युरोपीय संघाचे नियम पाळून करता येईल अशी उपचारात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

व्हॉटसअप तर्फे झालेला दंड खुपच जास्त असल्याने त्याविरोधात अपील केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले गेले आहे. त्यानुसार व्हॉटस अप सुरक्षित व खासगी सेवा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि जी सेवा दिली जाते ती माहिती पारदर्शी आणि व्यापक असते आणि हीच पद्धत व्हॉटस अप सुरु ठेवेल असे नमूद केले गेले आहे.