असे आहे पंजशीर शेरांचे प्रशिक्षण

अफगाणिस्थानच्या मोठ्या भूभागावर अमेरिकी सैनिक बाहेर पडल्यावर तालिबानी कब्जा झाला असला तरी अफगाणिस्थानमधील एका भागावर तालिबानिंची डाळ अजून शिजू शकलेली नाही. हा भाग आहे हिंदूकुश पर्वताजवळील पंजशीर घाटी. द.सनच्या रिपोर्टनुसार येथे तालिबानी प्रवेश सुद्धा करू शकलेले नाहीत. या घाटी किंवा खोऱ्याचे रक्षण करत आहेत जांबाज लढवय्ये. यांना शेरे पंजशीर (लायन्स ऑफ पंजशीर) म्हणून ओळखले जाते.

या लढवय्यांच्या प्रशिक्षणाचे काही फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. या दलात शेकडो तालिबान विरोधी लढवय्ये सामील झाले असून त्यांना नॉर्दन अलायंस नावाने ओळखले जाते. तालिबानींचा सुफडा साफ करणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. हे लढवय्ये खोऱ्यात राहणाऱ्या १ लाख ७० हजार अफगाणीना संरक्षण देत असून त्यांचे नेते आहेत अली नजरी.

तालिबानने या भागावर हल्ला करण्याचा प्रयत्न दोनवेळा केला मात्र त्यांना या लढवय्यांनी धूळ चारली आहे. उपाध्यक्ष अमसल्लाह सालेह यांनी अफगाणी राष्ट्रपती गनी देश सोडून गेल्याचे समजताच शेरे पंजशीरना एकत्र करून लढाई साठी तयार व्हा असे आदेश दिले आहेत. त्यासाठी या फोर्सचे कडक प्रशिक्षण सुरु झाले असून अवजड लाकडी ओंडके घेऊन पहाड चढणारे, पाण्यात सुद्धा गोळीबार प्रशिक्षण घेणारे लढवय्ये फोटोत दिसत आहेत.