हा आहे जगातील सर्वात सुंदर डास

ही पाहताच बाला, कलीजा खलास झाला हे गाणे अनेकांना माहिती आहे. त्याच धर्तीवर ‘हा पाहताच डास, प्रेमात पडतो खास’ असे काव्य करता येईल असा डास द. अमेरिकेच्या उष्ण जंगलात आढळतो. वास्तविक डास हा उपद्रवी कीटक डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया असे जीवघेणे रोग पसरवितो आणि जगात दरवर्षी या रोगांनी लाखो लोक जीवास मुकतात. त्यामुळे डास हे धोकादायकच आहेत.

साबेतीस सायनियस नावाचा, हा दिसायला अतिशय देखणा डास याला अपवाद नाही. पण हे डास दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक आहेत. बाकी डास काळे किंवा राखाडी असतात पण हा मात्र चमकदार, गडद निळ्या रंगाचा असतो. त्याच्या पायाला पंख असतात. आणि हा डास अतिशय चपळ आहे. त्यामुळे त्याचे फोटो घेणे हे महाअवघड काम आहे. कॅमेऱ्याचा फ्लॅश उडायचा अवकाश ही हे डास पण उडून जातात.

हा डास कितीही देखणा दिसला तरी तो माणसासाठी उपद्रवीच आहे. याच्यामुळे पिवळा ताप, डेंग्यू होऊ शकतो. जगात डासांच्या ३३०० प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत. त्यातील बहुतेकांत मादी रक्त शोषते. अंडी घालायच्या वेळी मादी जास्त प्रमाणात माणसाचे रक्त शोषुन घेते असेही दिसून आले आहे.