आंतरराष्ट्रीय सामन्यात रोनाल्डोचे नवे रेकॉर्ड, सर्वाधिक गोल नोंदविले

पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर क्रिस्तियानो रोनाल्डो याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वाधिक गोल नोंदविण्याचे रेकॉर्ड केले आहे. वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात आयर्लंड विरुद्ध त्याने दोन गोल नोंदविले आणि आपल्या गोल्स ची संख्या १११ वर नेली. ही कामगिरी करून त्याने इराणच्या अली देई यांचे १०९ गोल्सचे रेकॉर्ड मोडले आहे. अन्य कोणताही फुटबॉल खेळाडू अजून १०० गोल संख्येपर्यंत सुद्धा पोहोचलेला नाही.

३६ वर्षीय रोनाल्डोने युरो २०२० सामन्यातच अली देई यांच्या गोल्सची बरोबरी केली होती. नवे रेकॉर्ड नोंदविताना त्याने डोक्याने दोन्ही गोल मारले आणि ८८ मिनिटे चाललेल्या सामन्यात पिछाडीवर पडलेल्या पोर्तुगाल टीमला रोमांचक विजय मिळवून दिला.

रोनाल्डोने सर्वाधिक ३३ गोल वर्ल्ड कप क्वालिफाय मध्ये, ३१ गोल युरो चँपियन क्वालिफाय मध्ये, १९ आंतरराष्टीय मैत्रीपूर्ण लढती मध्ये, ७ वर्ल्ड कप मध्ये, ५ युए नेशन लीग मध्ये तर २ कॉन्फेडरेशन कप मध्ये केले आहेत. त्यासाठी त्याने १८० सामने खेळले आहेत. लियोनेल मेस्सी या त्यांच्या प्रतीस्पर्ध्याने १५१ सामन्यात ७६ तर भारताच्या सुनील छेत्री याने ७४ गोल नोंदविले आहेत. रोनाल्डो पुन्हा एकदा इंग्लिश क्लब मँचेस्टर बरोबर करारबद्ध झाला आहे.