UIDAI ने जाहीर केली आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी


नवी दिल्ली – आपल्या देशात आधारकार्डला किती महत्व हे नव्याने सांगायची गरज नाही. बँक खात्यापासून पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वत्र आधारचा वापर केला जातो. त्याची सामान्य माणसाची ओळख म्हणूनही ओळख आहे. त्यातच आता आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने महत्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे असल्यामुळे त्यावर चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता तुम्हाला अडचणीत आणू शकतो, म्हणून जर तुमच्या आधारमध्ये काही चूक असेल, तर ती दुरुस्त करा. आधार अद्ययावत करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध असतील या संदर्भातील कागदपत्रांची यादी यूआयडीएआयने जाहिर केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये आधार जारी करणारी संस्था UIDAI ने याबाबतची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की तुम्हाला जर आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही वापरलेले दस्तऐवज तुमच्या नावावर आहे आणि वैध आहे याची खात्री करा.


UIDAI च्या मते, 32 प्रकारची कागदपत्रे आधार कार्डसाठी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वीकारली जातात. नातेसंबंधाच्या पुराव्यासाठी 14, जन्म तारखेसाठी 15 आणि पत्त्याचा पुराव्यासाठी 45 कागदपत्रांचा स्वीकार केला जातो. या कागदपत्रांची देखील यादी दिली आहे.

  • नात्याचा पुरावा (Proof Of Relationship)

1. मनरेगा जॉब कार्ड
2. पेन्शन कार्ड
3. पासपोर्ट
4. आर्मी कॅन्टीन कार्ड

  • जन्म तारखेच्या पुराव्यासाठी

1. जन्म प्रमाणपत्र
2. पासपोर्ट
3. पॅन कार्ड
4. मार्क शीट्स
5. SSLC पुस्तक/प्रमाणपत्र

  • ओळखीच्या पुराव्यासाठी

1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. मतदार ओळखपत्र
5. ड्रायव्हिंग लायसन्स