पुण्यातील जेएसपीएममध्ये विविध पदांसाठी नोकर भरती


पुणे – कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुण्यातील जेएसपीएमने (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे) सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कार्यशाळा अधीक्षक अशा विविध रिक्त पदांसाठी जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असणा-या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचे विवरण

  • सहयोगी प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • ग्रंथपाल
  • शारीरिक शिक्षण संचालक
  • कार्यशाळा अधीक्षक

शैक्षणिक पात्रता

  • सहयोगी प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • ग्रंथपाल या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • शारीरिक शिक्षण संचालक या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • कार्यशाळा अधीक्षक या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

दरम्यान नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. तसेच ऑफलाइन पद्धतीने संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, महाराष्ट्र ४११०४६. या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत.

भरती प्रक्रिया – चाचणी किंवा मुलाखत

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२१ आहे.