सुंदर पिचाईना यामुळे बनवावा लागला होता गुगल मॅप

आज कुठल्याही देशात कुठेही जायचे असेल तर गुगल मॅपची मदत घेतली जाते. एखादे शहर, गावातला कानाकोपरा शोधणे, संबंधित ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, रस्त्यात वाहतूक कोंडी कुठे आहे, कोंडी टाळून जाता येईल असा मार्ग कुठला याची सर्व माहिती गुगल मॅप वर मिळते. मात्र गुगल मॅप बनवावा ही गरज का निर्माण झाली आणि त्यासाठी कोणते कारण घडले याची माहिती अनेकांना नसेल. गुगलची पॅरंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांच्या कल्पनेतून गुगल मॅप जन्माला आला आणि त्यामागचे कारण होते पिचाई आणि त्याच्या पत्नी अंजली यांच्यात झालेला वाद.

२००४ सालातली गोष्ट आहे. त्यावेळी सुंदर गुगलचे सीईओ होते. त्यांचे वास्तव अमेरिकेत आहे. एके दिवशी रात्री त्यांना त्यांच्या मित्राने पत्नीसह जेवणाचे आमंत्रण दिले होते. पिचाई याना ऑफिस मध्ये जाणे गरजेचे होते त्यामुळे पत्नीने घरून थेट मित्राकडे पोहोचायचे आणि पिचाई ऑफिस मधून तेथे पोहोचणार होते. वेळ होती रात्री आठची. पत्नी ठरल्याप्रमाणे वेळेवर पोहोचली पण सुंदर रस्ता चुकले आणि शोधत शोधत मित्राचे घर गाठताना रात्रीचे १० वाजले. तो पर्यंत अंजली पिचाई जेवण करून परत घरी गेल्या होत्या. हे कळले तेव्हा सुंदर न जेवताच घरी गेले.

घरी आल्याबरोबर वादावादी झाली आणि पत्नीचा मूड खराब आहे हे पाहून सुंदर परत ऑफिस मध्ये गेले आणि तेथेच त्यांनी रात्र घालवली. या वेळेत योग्य नकाशा असता तर आपला रस्ता चुकला नसता याची जाणीव त्यांना झाली आणि अशी वेळ कुणावरच येऊ नये म्हणून त्यांना गुगल मॅप बनविण्याचे ठरविले. ऑफिस मधील सहकाऱ्यांना सुरवातीला या कामाला स्पष्ट नकार दिला पण सुंदर यांनी अखेर त्यांना पटावले आणि खूप मेहनत घेऊन अखेर हा मॅप तयार झाला. २००५ मध्ये तो अमेरिकेत लाँच झाला तर २००६ मध्ये इंग्लंड आणि २००८ मध्ये भारतासह जगभर लाँच झाला. आज जगातील दर सात माणसांपैकी एक गुगल मॅपचा वापर करतो.