काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोनाबांधितांची नोंद, तर 460 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 41,965 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 460 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात 33,964 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

यापूर्वी देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे, केरळात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. काल दिवसभरात केरळात कोरोनाच्या 30,203 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,196 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 688 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 62 लाख 72 हजार 800 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 03 टक्के आहे. तसेच काल दिवसभरात राज्यात 104 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 515 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत काल दिवसभरात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3106 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1511 दिवसांवर गेला आहे.