डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरीची संधी


औरंगाबाद – कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे काही पदांसाठी नोकर भरती सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ही भरती सुरक्षा अधिकारी या पदासाठी होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट किंवा www.bamu.ac.in या लिंकवर भेट देऊन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० सप्टेंबर २०२१ असणार आहे.

शैक्षणिक पात्रता
सुरक्षा अधिकारी या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आहे, त्याचबरोबर सुरक्षेच्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० सप्टेंबर २०२१ आहे. तर १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे अर्जाची हार्ड कॉपी पाठवायची आहे. पदासाठी अर्ज करण्याची पध्दत ही ऑनलाइन स्वरुपाची असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या अधिकृत वेबसाईटला सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या.