बलात्कार प्रकरणी न्यायालयाची टीप्पणी; शारिरीक संबंधावेळी कंडोम वापरला म्हणजे संमतीने सेक्स केला असे नाही


मुंबई – एका नौदलाच्या अधिकाऱ्याला बलात्काराच्या खटल्याचा तपास संपल्याच्या कारणावरून मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी जामीन मंजूर केला. पण न्यायालयाने यावेळी बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना, कंडोम वापरला याचा अर्थ असा नाही की संमतीने सेक्स केला, अशी टीप्पणी केली आहे. सहयोगी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा एका नौदलातील कर्मचाऱ्यावर आरोप आहे. न्यायालयात त्याच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, केवळ घटनास्थळी कंडोम उपस्थित असल्यामुळे तक्रारदाराचे आरोपीशी सहमतीचे संबंध होते, असे म्हणणे पुरेसे नाही, असेही होऊ शकते की आरोपीने पुढील त्रास टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला असावा. न्यायालयाने हे स्पष्टीकरण एका नौदल कर्मचाऱ्यावर बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात दिले आहे. नौदलातील जवानावर त्याच्या सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने न्यायालयात दावा केला होता की संबंध दोन्ही बाजूने संमतीनंतरच ठेवले गेले. या दाव्याच्या समर्थनार्थ ते कंडोम लावण्याविषयी बोलले होते, त्यावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

दरम्यान, आरोपीच्या जामीन अर्जाला सरकारी वकील कल्पना हिरे यांनी विरोध केला, कारण तपास संपला असला तरी आरोपी पीडितेला आणि तिच्या पतीला धमकावू शकतात, अशी सर्व शक्यता आहे.