निवृत्ती ! आता क्रिकेट मैदानात धडधडाणार नाही ‘स्टेन’गन


दक्षिण आफ्रिका – क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने निवृत्ती घेतली आहे. एक पोस्ट त्याने ट्विटरवर शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलपूर्वी आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीचा स्टेनने शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला रामराम केला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने २६५ सामन्यांमध्ये ६९९ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. त्याने ९३ कसोटी सामन्यांमध्ये ४३९, १२५ एकदिवसीय सामन्यात १९६ आणि ४७ टी-२० सामन्यांमध्ये ६४ विकेट्स घेतल्या आहेत.

२००४मध्ये इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये स्टेनने कसोटी पदार्पण केले. २००५मध्ये त्याने आफ्रिका इलेव्हनविरुद्ध सामना खेळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २००७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्टेनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. स्टेन बराच काळ संघाबाहेर होता. त्याने मार्च २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.