कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी नोकर भरती
दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.
- या पदांसाठी भरती
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
ग्रंथपाल (Librarian)
- पात्रता आणि अनुभव
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
- या पत्त्यावर पाठवा अर्ज – शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, डेक्कन, पुणे 411004.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021