हुवाईचे डिस्प्ले आपोआप वाढणाऱ्या स्मार्टफोन साठी पेटंट

हुवाईने सॅमसंग आणि अॅपल या बलाढ्य कंपन्याच्या पुढे एक पाउल टाकून नवीन स्मार्टफोन साठी पेटंट घेतले असल्याचे ‘लेट्स गो डिजिटलच्या’ रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. या रिपोर्ट नुसार सॅमसंगने त्यांचा फोल्डेबल फोन नुकताच सादर केला आहे आणि आणि अॅपल फोल्डेबल फोन बनायच्या तयारीत आहे अश्यावेळी हुवाईने त्यांच्या पुढचे पाउल टाकून नव्या डिव्हाईस साठी पेटंट घेतले आहे. चारी बाजूनी रॅप होणारा, फ्रंट साईड व रिअर पॅनल कव्हर करणारा रोलेबल म्हणजे गुंडाळता येणारा डिस्प्ले या फोन साठी दिला जाईल.

हा डिस्प्ले पुढच्या बाजूला ओढता येतो आणि डिस्प्ले छोट्या टॅबलेटच्या आकाराचा होतो. उजव्या बाजूने स्क्रीन ओढता येतो. या फोन साठी ६.५ इंची डिस्प्ले आहे मात्र गरजेनुसार तो ताणून ११ इंची करता येतो. कंपनीच्या मेट सिरीज मध्ये हा फोन लाँच केला जाईल असे समजते. हा फोल्डिंग स्क्रीन नाही त्यामुळे डिस्प्लेवर क्रीझ येण्याचा धोका नाही. रीअरला ट्रिपल कॅमेरा सेट असेल तर सेल्फी साठी फ्रंट कॅमेरा असेल. रोल होणारा फोन प्रथमच बाजारात येणार असून हुवाईने त्यासाठी पेटंट घेतले आहे.