रिलायंस, टीव्ही, फ्रीज उत्पादन, विक्री क्षेत्रात उतरणार

देशातील बडी उद्योग कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायंस रिटेलने प्रतिष्ठित स्वदेशी ब्रांड बीपीएल आणि केल्व्हिनेटरच्या ग्राहक उपयुक्त वस्तूं उत्पादने आणि विक्रीसाठी मार्केटिंग परवाना मिळविला आहे. या माध्यमातून रिलायंस रिटेल टीव्ही, फ्रीज उत्पादन व विक्री क्षेत्रात उतरत आहे. आगामी सण, उत्सव काळात ग्राहकपयोगी उत्पादने विक्रीसाठी विशेष ऑफर, बोनस, बडी होर्डिंग, बॅनर्स फारशी दिसणार नाहीत. याचे मुख्य कारण करोना मुळे ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीला दिलेले प्राधान्य लक्षात घेऊन ई टेलर्स कंपन्यांनी या वस्तूंच्या विक्रीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.

याचाच एक भाग म्हणून रिलायंस रिटेलने येत्या उत्सव काळात अमेझॉन आणि फ्लिपकार्ट विक्रेत्यांसाठी ठेवलेल्या ४० ते ७० टक्के ऑर्डरचा साईज ७० ते ४०० टक्के पर्यंत वाढविला आहे. त्यात दोन जुन्या भारतीय ब्रांडच्या पुनर्जीवन व सर्व चॅनल्सच्या माध्यमातून विक्री आणि आक्रमक मार्केटिंग साठी काम सुरु केले आहे. रिलायंस रीटेल गतवर्षी सुरु झाली आणि त्यांनी पहिल्याच वर्षात ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वाढविला असून राष्ट्रव्यापी उपस्थितीचा प्रयत्न केला आहे.

बीपीएल आणि केल्व्हीनेटर उत्पादने ऑफलाईन, ऑनलाईन, सर्व स्थानिक इलेक्ट्रॉनिक स्टोर्स, रिटेल व ऑनलाईन पोर्टल वर वितरित केली जातील असे सांगितले जात आहे.