राज कुंद्रापासून वेगळी राहणार शिल्पा शेट्टी?


गेल्या काही महिन्यांपासून खूप अडचणींना बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सामोरे जात आहे. सध्या पोलीस कोठडीत शिल्पाचा पती राज कुंद्रा आहे आणि अभिनेत्री एकटीच तिच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहे. हळूहळू आपले आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी शिल्पा प्रयत्न करत आहे. ती पुन्हा एकदा आपल्या शोच्या शुटींगमध्ये व्यस्त झाली आहे आणि मुलांची पूर्ण काळजीही घेत आहे. पण या दरम्यान आता अभिनेत्रीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

यासंदर्भात बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार अहवालानुसार शिल्पा तिच्या दोन मुलांसोबत स्वतंत्रपणे राहण्याचा विचार करत आहे. तसेच शिल्पाचा एक जवळचा मित्र म्हणाला की, राज कुंद्राच्या मागचा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज कुंद्राचे नाव अश्लील चित्रपट प्रकरणात आल्यानंतर शिल्पा शेट्टीला धक्का बसला आहे. या पैशातूनचा हिरे आणि राजची कमाई येत आहे, हे शिल्पाला माहित देखील नव्हते.

राजने चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशांपासून शिल्पाला तिच्या मुलांना दूर ठेवायचे आहे. तिला राजची कमाई वापरायची नाही. रिअॅलिटी शो जज करून स्वतः कमावलेल्या पैशातून ती मुलांचे संगोपन करणार आहे आणि आता ती आणखी चित्रपटांमध्ये देखील काम करणार आहे. चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी शिल्पाला वचन दिले आहे की, ते तिला चित्रपटात काम देतील. जरी, राज बराच काळ पोलीस कोठडीत राहिला, तरी अभिनेत्रीला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

आता ही बातमी कितपत खरी आहे की खोटी, हे स्वतः शिल्पा शेट्टीच सांगू शकते. आता शिल्पा राजच्याच घरात राहणार की, मुलांना घेऊन वेगळी राहणार यावर तिने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.