पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धे देवेंद्र झाझरियाने रौप्य तर सुंदर गुजरने जिंकले कांस्यपदक


टोकियो : भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत देवेंद्र झाझरियाने रौप्यपदक तर सुंदर गुजरने कांस्यपदक जिंकल्यामुळे भालाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये भारताने 7 पदकांची कमाई केली आहे.

या स्पर्धेच्या सुवर्णपदकावर श्रीलंकेच्या एम. हेराथने नाव कोरले. 67.79 मीटर त्याने भाला फेकला. तसेच देवेंद्रने 64.35 मीटर आणि सुंदर सिंहने 64.01 मीटर लांब भाला फेकला. यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील देवेंद्र झाझरियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. देवेंद्रच्या नावावर भारतासाठी दोन वेळा सुवर्णपदक जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.