आता ईडी लागली असून एकनाथ खडसेंनी त्यांची सीडी दाखवावी; गिरीश महाजन


जळगाव : ईडी आणि सीडी बाबत मागील अनेक दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू आहे. पण हा विषय आता जुना झाला असला तरी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आता ईडी लागली असून त्यांनी आता सीडी दाखवावी, असे आव्हान दिले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. गिरीश महाजन या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही महिन्यांपासून ईडी आणि सीडीवरून गाजत आहे. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची इडीची चौकशी सुरु असून, सीडी केव्हा लागेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, काही जणांकडून सीडीबाबत अभ्यास व तपासणी सुरू आहे. ती तपासणी व अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहिररित्या सीडी दाखवावी, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.