सप्टेंबर महिन्याच्या १० ते १२ दरम्यान सलग तीन दिवस बंद असणार बँका


मुंबई – अवघे २ दिवस सप्टेंबर महिना सुरु व्हायला शिल्लक असून हा महिना विशेषतः बँकेच्या कामांसाठी तुम्हाला महत्त्वाचा ठरेल. बँकेची तुमची कोणती काम खोळंबलेली असतील, तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमची खोळंबलेली कामे पूर्ण करता येणार आहेत. कारण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना कमी दिवस सुट्ट्या असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, बँकेना एकूण ७ दिवस सुट्टी सप्टेंबरमध्ये असणार आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात बँकांना शनिवार आणि रविवार मिळून एकूण ७ दिवसांची सुट्टी असणार आहे.

बँकांना सप्टेंबर महिन्यात असणाऱ्या या ७ सात सुट्यापैकी ३ सुट्ट्या सलग असणार आहेत. बँका १० सप्टेंबर, ११ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर असे सलग तीन दिवस बंद रहाणार असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची काही कामे असतील, तर ती शक्यतो १० तारखेच्या आधीच करा. कारण, १० तारखेला गणेश चतुर्थी, ११ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार तर १२ सप्टेंबरला रविवार आल्यामुळे बँकां ३ दिवस बंद असणार आहेत.

राज्यनिहाय पारंपरिक सण उत्सव, धार्मिक तसेच अन्य महत्त्वाच्या दिवशी या सुट्ट्या रिझर्व्ह बँकेकडून जाहीर केल्या जातात. त्याप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या ‘Holiday under Negotiable Instruments Act’ अंतर्गत ठरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांच्या सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. म्हणजेच, आठवड्याच्या सुट्ट्या वगळता (शनिवार, रविवार) रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अन्य सुट्ट्या देशातील सगळ्याच बँकांना लागू असतील असे नाही.