वाय-फायचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाबद्दल जाणून घ्या मजेशीर गोष्टी


वाय-फायने आज सर्वांचेच काम अगदी सोपे केले आहे. याचे जनक अमेरिका-सर्बियाई वैज्ञानिक निकोला टेस्ला यांचा जन्म आजच्याच दिवशी 10 जुलै 1856 मध्ये झाला होता. 7 जानेवरी 1943 ला वयाच्या 83 व्या वर्षी न्युयॉर्क येथे त्यांचा मृत्यू झाला.

सर्बो-क्रोएशीयन, चेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, आणि लॅटीन या आठ भाषांचे जाणकार असलेल्या निकोला टेस्ला यांनी केवळ वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावलेला नाही. तर त्यांनी एसी करंट, टेस्ला वेव्स, विजेपासून चालणारी मोटर,रोबोटिक्स, रिमोट कंट्रोल, रडार, एक्स रे अशा अनेक गोष्टींचा अविष्कार केला आहे.

त्यांच्याबद्दल सांगितले जाते की, शाळेत असताना गणिताच्या अवघड प्रश्नांची उत्तरे ते तोडींच देत असे. कामात अडचण होऊ नये यामुळे त्यांनी लग्न केले नाही.  1926 मध्येच त्यांनी स्मार्ट फोन बनवण्याबद्दल विचार केला होता. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याबद्दल काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊया.

त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलच्या वेड्या होत्या महिला –
टेस्लांनी कधी लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, विज्ञानासाठी ते आपले संपुर्ण आयुष्य देत आहेत. संपुर्ण आयुष्य विज्ञानासाठी देणाऱ्या या व्यक्तीच्या ड्रेसिंग सेंसवर महिला वेड्या होत्या. ते अन्य वैज्ञानिकांप्रमाणे केवळ रिसर्चमध्येच वेळ घालवत नसे, तर काही वेळ सामाजिक गोष्टींसाठी देखील देत असे.

त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलवर महिला वेड्या होत असे. मार्क ट्विन सारख्या प्रसिध्द सारख्या प्रसिध्द लोक त्यांचे मित्र होते. अनेक महिलांचे त्यांच्यावर प्रेम होते. मात्र त्यांनी कधीच लग्न केले नाही.

केवळ दोन तास झोपायचे –
संपुर्ण आयुष्य टेस्ला यांनी एक नियमित वेळेचे पालन केले. काही लोकांचा असा दावा आहे की, ते रात्री केवळ 2 तासच झोपत असे. ते नेहमी न्युयॉर्कच्या व त्यानंतर वाल्डोर्फ-एस्टोरिया हॉटेलमध्ये एकाच डेबलावर जेवण करत असे. किटाणूंपासून त्यांना भिती वाटत असे त्यामुळे ते नेहमी आपल्याबरोबर 18 नॅपकिन असलेला एक पॅकच सोबत ठेवत असे. तीन आकडा त्यांच्या आवडीचा होता.

भुकंप आणणारी मशीन बनवल्याचा दावा –
टेस्ला यांनी वाफेपासून चालणारी इलेक्ट्रिकल जनरेटर इलेक्ट्रो-मॅकेनिकल ऑस्किलेटरचा शोध लावला होता. मात्र हे इंजिन स्टीम टर्बाइन्ससमोर टिकू शकले नाही. असे सांगण्यात येते की, टेस्लांनी आपल्या मित्रांना सांगितले होते की, ते मॅनहॅट्टनमध्ये 46 ईस्ट ह्यूस्टन स्ट्रीट येथील प्रयोगशाळेत थरथरवणाऱ्या ऑस्किलेटरवर काम करत आहेत.

मात्र याच्या आवाजाने निर्माण झालेल्या कंपनामुळे आजूबाजूच्या इमारती आणि जमीन हलू लागल्या व त्यांनी पोलिसांना फोन केला. जेव्हा मशीनने कंपनाला सुरूवात केली तेव्हा टेस्ला यांना वाटले की, मशीन भुंकप निर्माण करू शकते. त्यामुळे त्यांनी हॅमरने मशीनला तोडून टाकले. या दाव्याने या मशीनला टेस्लांची भुंकप मशीन असे नाव मिळाले. मात्र ही गोष्ट खोटी असल्याचे नंतर सांगण्यात आले.

संपुर्ण जगाला प्रकाशमय करण्याचे स्वप्न – 

टेस्ला यांचे म्हणणे होते की, त्यांच्या कामाने ते पुर्ण पृथ्वीला प्रकाशमय करतील. त्यांचा विश्वास होता की, अंधार समाप्त करून प्रकाशाचे एक नवीन युग सुरू करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. ते म्हणाले होते की, पृथ्वीच्या वरील वायुमंडळामध्ये गॅस विद्यूत धारा घेऊन जाण्यास सक्षम आहे. त्यामुळे रात्री देखील प्रकाश राहू शकतो. जो शिपिंग लेन आणि हवाई अड्ड्यांना सुरक्षित बनवले आणि पुर्ण शहराला प्रकाशमय करेल. मात्र टेस्ला यांचा हा प्रयोग कधीच पुर्ण झाला नाही.

Leave a Comment