प्रत्येक घड्याळाच्या जाहिरातीत 10:10 हीच वेळ का दाखवतात ?


घड्याळाच्या जाहिराती तुम्ही असंख्य वेळा पाहिल्या असतील. घड्याळांच्या या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 अशीच वेळ दाखवण्यात आलेली असते. मात्र तुम्हाला माहित आहे का ? हीच वेळ का दाखवण्यात येते. हीच वेळ दाखवण्यामागे पाच कारणे असू शकतात. याच कारणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असे म्हटले जाते की, 10 वाजून 10 मिनिटांवर घड्याळांचे काटे संतुलित आकारात असतात. मनोविज्ञानानुसार लोकांना संतुलित गोष्टीच पाहायला आवडतात. जेव्हा तुम्ही 10:10 वेळ असणारे घड्याळ बघाल, तेव्हा असे वाटते की घड्याळ हसत आहे. तुम्ही हसणारी स्माईली बघितलीच असेल. यावेळी घड्याळ तसेच असल्यासारखे दिसते.

घड्याळामध्ये जेव्हा 10 वाजून 10 मिनिटे झालेली असतात. तेव्हा वी आकाराचा एक सकेंत दिसतो. हा संकेत विजयाचा असतो. त्यामुळे कंपन्या घड्याळांच्या जाहिरातींमध्ये हा वेळ दाखवतात. 10 वाजून 10 मिनिटे अशी वेळ दाखवल्याने घड्याळातील सर्व गोष्टी, कंपनीचे नाव, लोगो स्पष्ट दिसतो. त्यामुळे ही वेळ दाखवण्याचे हे देखील एक कारण असू शकते.

काही लोकांचा असा समज आहे की, जेव्हा पहिले घड्याळ बनले होते तेव्हा हीच वेळ होती. त्यामुळे डिफॉल्ट वेळ ही 10:10 अशी सेट करण्यात आली आहे.

Leave a Comment