या तलावाचे पाणी पिल्यावर लोकांचा मृत्यू होतो


जगात असे अनेक रहस्मयी तलाव आहेत, ज्यांच्या रहस्याबद्दल आजही कोणालाच माहित नाही. एक असाच तलाव दक्षिण अफ्रिकेच्या लिंपोपो प्रातांमध्ये आहे. या तलावाला ‘फुन्दूजी तलाव’ नावाने ओळखले जाते. असे समजले जाते की, जो कोणी या तलावाचे पाणी पितो, तो जिंवत राहत नाही. लवकरच त्याचा मृत्यू होतो.

स्थानिक लोकांनुसार, प्राचीन काळात तेथून जाणाऱ्या एका कुष्ठ रोग्याला येथे राहणाऱ्या लोकांनी जेवण आणि आश्रय देण्यास नकार दिला होता. त्यानंतर तो व्यक्ती त्या तलावात घुसला आणि अचानक गायब झाला. सांगण्यात येते की, तलावाच्या आतून सकाळी सकाळी ड्रम वाजवण्याचे आवाज, प्राण्यांचे  आणि लोकांचे ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. स्थानिक लोक हे देखील सांगतात की, या तलावाची रक्षा पहाडांवर राहणारा एक मोठा अजगर करतो. या अजगराला प्रसन्न करण्यासाठी स्थानिक वेंदा अदिवासी नृत्य उत्सावाचे आयोजन करत असतात. या कार्यक्रमात लग्न न झालेल्या मुली नाचतात.

या तलावाची निर्मिती प्राचीन काळात भुस्लख्खनमुळे मुटाली नदीचा प्रवाह थांबल्याने झाली आहे. आता हे एक रहस्यच झाले आहे की, या तलावाचे पाणी तर एकदम स्वच्छ आहे. मग हे पाणी पिल्याने लोकांचा मृत्यू का होता? या पाण्याचे रहस्य समजून घेण्याचे अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणालाच त्याची माहिती मिळाली नाही. सांगण्यात येते री 1946 मध्ये या तलावाच्या पाण्याचे सत्य जाणून घेण्यासाठी एंडी लेविन नावाचा एक व्यक्ती आला होता. त्याने तेथून पाणी, काही झाडे घेतली आणि निघून गेला. मात्र पुढे जाऊन तो रस्ताच चुकला.

असे त्याच्याबरोबर अनेकवेळा झाले. त्यानंतर त्याने घेतलेले पाणी आणि झाडे टाकून दिली. तेव्हा त्याला रस्ता सापडला. मात्र त्यानंतर एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. या तलावाचे पाणी आजही लोकांसाठी एक रहस्य आहे. अनेक लोक या मागे विषारी गॅसच्या उत्सर्जनामुळे असे होते असे सांगतात. मात्र यामागे कोणताही पुरावा नाही.

Leave a Comment