10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-5)


कमी गुंतवणूक करून कोणता व्यवसाय सुरू करावा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. मात्र त्याचबरोबर स्वतःची आवड जोपासणे आणि पैसा कमवणे या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे देखील आवश्यक असते. मात्र पैसे कमवण्याच्या काळात आवड जोपासणे सगळ्यांनाच शक्य असते असे नाही. मात्र असे काही व्यवसाय आहेत, जे तुम्ही तुमची आवड म्हणून सुरू करू शकता आणि त्यातून नफा देखील मिळवू शकता.

मागील भागात ऑनलाईन बेकरी आणि ब्लाँगिंगद्वारे तुम्ही कसे पैसे कमवू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली होती. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही तुमची आवड देखील जोपासू शकता व पैसे देखील मिळवू शकता.

युट्यूब चॅनेल –
युट्यूब हे क्रेएटिव आणि हटके लोकांसाठी एक उत्तम प्लॅटफार्म आहे. यामध्ये जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला पैसे तर मिळतातच पण त्याचबरोबर नावलौकीक देखील मिळतो. युट्यूब तुम्हाला तुमचे स्वतंत्र चॅनेल सुरू करण्याची परवानगी देते. त्यावर तुम्ही तुमच्या आवडीचे कुठल्याही विषयांवरचे व्हिडीओ अपलोड करू शकता. जर तुम्ही वारंवार व्हिडीओ टाकत राहिला तर तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होता. यासाठी केवळ तुम्हाला व्हिडीओ बनवण्याची गरज आहे आणि तो व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक आहे. अगदी कमी खर्चात तुमची आवड जोपासत हा व्यवसाय तुम्ही करू शकता.

इव्हेंट ऑर्गनायझेशन-
इव्हेंट मॅनेजरला आपण खूप कमी वेळा ऑफिसमध्ये बसलेले पाहत असतो. मॅनेजर नेहमीच सतत कोणाशी तर संपर्क करण्यात, योग्य जागेची निवड कऱण्यात, ग्राहक शोधण्यात, सर्व गोष्टींचे योग्य नियोजन करण्यात गुंतलेला असतो. सध्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी इव्हेंट घेतले जातात. त्यामुळे इव्हेंट ऑर्गनायझेशन हा कमी खर्चात एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो. तुम्ही स्वतःचा नंबर ऑनलाईन अपलोड करू शकता व घरी बसून देखील हा व्यवसाय संभाळू शकता. येणाऱ्या कस्टमर्सची मागणी काय आहे. त्यानुसार तुम्ही सर्व घरी बसून देखील नियोजन करू शकता. त्यामुळे कमी खर्चात हा व्यवसाय चांगला नफा देऊ शकतो.

Leave a Comment