सध्या ऑनलाईनचा काळ आहे. ऑनलाईनद्वारे अनेक गोष्टी सहज करतात. ऑनलाईनद्वारे चालणारे अनेक व्यवसाय आहेत. मागील भागात आम्ही तुम्हाला कमी खर्चात शिवणकाम आणि ज्युस सेंटर हे व्यवसाय कसे सुरु करता येतील याबद्दल माहिती दिली होती. आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय सुरू करून, अगदी कमी गुंतवणूकीत व्यवसाय कसा सुरु करू शकता याबद्दल माहिती देणार आहे.
ऑनलाईन बेकरी –
आज ऑनलाईन खाद्य पदार्थ ऑर्डर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. झोमॅटो, स्विगी, उबेर इट्स सारख्या कंपन्याद्वारे ऑनलाईन खाद्य पदार्थाची ऑर्डर मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मालाची विक्री करु शकता. खास करुन केक सारखे पदार्थ ऑनलाईन सहज विकले जातात.
10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-4)
खाद्य पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकी व्यतरिक्त ऑनलाईन कंपन्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. कोलकत्ताच्या चारुलता घोषने 2013 अशाच प्रकारचा व्यवसाय सुरू केला असुन, दिवसेंदिवस तिच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे.
ब्लॉगिंग –
सध्या काळात ऑनलाईन क्षेत्रात ब्लॉगिंग हे एक महत्त्वपुर्ण माध्यम झाले आहे. याद्वारे तुम्ही पैसे तर मिळवूच शकता मात्र त्याचबरोबर तुमची आवड देखील जोपासू शकता. जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर हे माध्यम तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. प्रोफेशनल ब्लॉगिंगसाठी अगदी कमी गुंतवणूकीची गरज आहे. यासाठी तुम्हाला एक योग्य डोमेन आणि होस्टिंग घेण्याची गरज आहे. 4000 हजार रुपयांपर्यत तुम्ही अनलिमिटेड स्पेस असणारे होस्टिंग घेऊ शकता. तसेच यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता लागेल. त्यामुळे अगदी कमी खर्चात तुम्ही हे करु शकता. तुमच्या आवडीचे वेगवेगळे विषय ट्रॅव्हल ब्लॉगिंग, तुमची मते, अनुभव, कविता अशा अनेक गोष्टी तुम्ही लिहू शकता व याद्वारे अनेक मार्गातुन तुम्ही पैसे मिळवू शकता.