10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-3)


व्यवसाय सुरू करणे सोपी गोष्ट नसते. योग्य नियोजन करून, भांडवल गोळा करून व्यवयासायाची सुरूवात करावी लागत असते. मात्र मुख्य प्रश्न हा भांडवलाचाच असतो. मागील भागामध्ये आम्ही तुम्हाला नाश्ता -चहाचे दुकान आणि ट्युशन सेंटर अगदी कमी खर्चात कसे सुरू करता येतील याविषयी माहिती दिली होती. आज आपण अशाच काही व्यवसायांविषयी जाणून घेणार आहोत, जे अगदी 10 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करता येतील.

शिवणकाम (टेलर) –
सध्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कपड्यांची मार्केटमध्य चलती आहे. यामुळे मुंबई, कोलकत्ता, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये चांगल्या ट्रेलर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक छोटीशी भाड्याने जागा व एक शिवण मशीन याद्वारे तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. अनेक जण शिवण मशीन असेल तर घरच्या घरी देखील हा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे जागेचा प्रश्न देखील सुटतो. त्यामुळे अगदी किरकोळ खर्चात हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

ज्युस सेंटर –
ताज्या फळांचा रस पिणे कोणाला आवडत नाही? वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या फळांचा रस पिण्याची लोकांना आवड असते. सफरचंद, कलिंगड, ऊस इत्यादी फळांचा रस पिणे लोकांना आवडत असते. त्यामुळे अगदी कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करणे नेहमीच फायद्याचे ठरते. यासाठी तुम्हाला वर्दळीचे ठिकाण बघून, जागा भाड्याने घेण्याची गरज आहे. याशिवाय फळे, रस बनवणारे यंत्र इं. गोष्टी स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे 10 हजारांपेक्षा कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Leave a Comment