NCBने केली अभिनेता अरमान कोहलीला अटक


मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर आज अरमान कोहलीला अटक केल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला. एनसीबीने एका ड्रग पेडलरला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला होता.

टिव्ही अभिनेता गौरव दीक्षितला देखील एनसीबीने अटक केली आहे. गौरवला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी गौरवच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती समोर येत आहे. एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्ज यामध्ये एनसीबीला मिळाल्या आहेत. चित्रपट अभिनेता एजाज खानच्या केलेल्या चौकशीत गौरवला अटक करण्यात आली आहे.