जाणून घ्या बडीशेपचे हे देखील फायदे


आपण आजवर बडीशेपचा वापर एकतर मुखशुद्धीसाठी केला असेल किंवा मसाला बनवताना वापरले असेल. पण या बडीशेपचे अनेकही आरोग्यदायी फायदे आहेत. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात काय आहेत ते फायदे…

व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि मॅगेनीज बडीशेपमध्ये असते हे आपल्यापैकी अनेक माहितच असेल. बडीशेपमध्ये असणारे अ‍ॅटिऑक्सिडंट चयपचनासाठी मदत करतात. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

ज्यांना अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.

बडीशेप त्वचेसाठी दररोज खाणे फायदेशीर आहे. 2012 साली झालेल्या एका संशोधनानुसार रोज बडीशेप खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरच्या धोका कमी होतो.

दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालून, या पाण्याला एक उकळी आणावी. या पाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दोन लहान चमचे बडीशेप एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यानंतर इतर काही खाण्यापिण्याच्या आधी या बडीशेपेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी रक्त शुद्ध करण्याचे काम करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment