काय आहे चेंगीजखानच्या कबरीचे रहस्य?


मंगोलियाचा शासक आणि क्रूरकर्मा चेंगीजखान हा त्याचा क्रौर्याबद्दल असा इतिहासात प्रसिद्ध होता तासाचा त्याच्या शौर्याबद्दलहि होता. १२ आणि १३ व्या शतकातील हा सम्राट जगभरात प्रसिद्धी पावला. विशेष म्हणजे पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट इतिहासात ग्राह्य मानली जात नाही. मात्र चेंगीजखानच्या जन्माचा आणि मृत्यूचा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही तरीही त्याने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.

हा असा एकमेव योध्या होता की तो ज्या भागातून जात असे तेथे जणू विनाशाचा पूर येत असे. शत्रूशी त्याची वर्तणूक पशूपेक्षाही भयानक होती. त्याच्या नुसत्या नावाने लोक चळाचळा कापत असत. चेंगीजखानाचा मृत्यू आणि त्याची कबर हे आजही जगासमोरचे मोठे कोडे असून हजारो डॉलर खर्च करून त्याच्या कबरीचा शोध घेण्याचे पर्यंत शेकडो वर्षे केले जात आहेत मात्र ती अजून सापडलेली नाही.

चेंगीजखान त्याच्याविषयी पुढच्या पिढीला काहीही समजू नये अशी इच्छा होती त्यामुळे अज्ञात जागी आपले दफन केले जावे असे त्याने मृत्युपत्र केले होते. त्यानुसार हे दफन केले गेले आणि त्या जमिनीवरून हजारो घोडे फिरविले गेले जेणेकरून कबरीचे कोणतेही अवशेष दिसू नयेत. इतकेच नाही तर दफनासाठी जे २ हजार लोक गेले होते त्यानाही हे रहस्य कायम राहावे म्हणून ठार केले गेले असे सांगतात.

मंगोलियातील लोकांना या कबरीची माहिती आहे असा समज आहे. मात्र या लोकांमध्ये अशी भावना आहे कि चंगेजखांची कबर शापित आहे. ज्याने त्याचे दफन केले त्यानेच हा शाप दिला जो ही कबर उघडेल त्याला मृत्यू येईलच पण जगाचाही विनाश होईल. गेली ८०० वर्षे या कबरीचा शोध सुरु असून उपग्रह प्रतीमांवरूनही शोध घेतला जात आहे. एका इंग्लिश चॅनलने व्हॅली ऑफ खान या नावाने हि मोहीम चालविली आहे असेही सांगितले जाते.

Leave a Comment