यो यो हनी सिंहच्या विरोधात पत्नीची घरगुती हिंसेची तक्रार


यो यो हनी सिंह उर्फ ​​ह्दयेश सिंग हा बॉलीवूडमध्ये पॉप सिंगर, गीतकार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्याच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवार यांनी तक्रार दाखल केली असून शालिनी यांनी आपल्या वकिलांद्वारे घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणावर आज दिल्ली कोर्टात सुनावणी झाली. हनी सिंहच्या वकिलाने यावेळी त्याची तब्येत बिघडल्याचे सांगत अनुपस्थितीबाबत कळवले. तसेच न्यायालयाला आश्वासन दिले की पुढील सुनावणीच्या वेळी तो तारखेला हजर होईल. दिल्ली न्यायालयाने यावर त्यांच्याकडे वैद्यकीय अहवाल मागितला आणि यो यो हनी सिंहचे आयकर विवरण देखील मागितले. तसेच कायद्याच्या वर कोणीही नसल्याचे म्हटले आहे. हनी सिंहच्या वकिलांनी यावर लवकरात लवकर वैद्यकीय नोंदी आणि आयकर विवरणपत्र दाखल केले जाईल असे आश्वासन दिले.

पत्नी शालिनी तलवार यांनी यो यो हनी सिंग उर्फ ​​ह्दयेश सिंग याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शालिनी यांनी आपल्या वकिलांद्वारे घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तिस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने शालिनी सिंगच्या याचिकेवर हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी करुन 28 ऑगस्टपर्यंत पत्नीने लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावले होते.

शालिनी सिंग यांनी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या या याचिकेत पती हनी सिंगवर घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दोघांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्ता विकण्यासंदर्भात निर्देश जारी करताना हनी सिंगला अशा मालमत्तांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.