असा आहे ‘इस्लामिक स्टेट के’ चा अड्डा असलेला खुरासान प्रांत

काबुल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट के( आय एस खुरासान) यांनी घेतली असून या संघटनेचा तळ अफगाणिस्थानचा प्राचीन भाग असलेल्या खुरासान येथे आहे. या प्रांतावरूनचा या संघटनेने त्याच्या नावात के जोडले आहे. कसा आहे हा भाग याविषयीची थोडी माहिती आमच्या वाचकांसाठी

आयएस खुरासान सिरीया, इराक मध्ये सक्रीय असून इसीसची सहकारी संघटना आहे. खुरासान हे प्राचीन काळी मध्य आशियामधले ऐतिहासिक क्षेत्र होते. त्यात अफगाणिस्थान, तुर्कमेनिस्थान, उज्बेकीस्तान, ताजीकीस्थान व पूर्व इराणचा काही भाग येतो. इराण मध्ये आजही या नावाचा प्रांत आहे. या भागावर पूर्ण कब्जा मिळवून पुन्हा नवे साम्राज्य बनवायचे हे इस्लामिक स्टेटचे स्वप्न आहे.

या नावातील खूरचा अर्थ सूर्य असा असून असान म्हणजे येणे. सूर्य जेथून येतो तो भाग. २५ हजार चौरस मैलाचा हा परिसर पहाडी, वाळवंट आणि खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा आहे. दक्षिण भागात ११ ते १३ हजार फुट उंचीच्या पर्वत रांगा आहेत. निसर्गरम्य असा हा परिसर केसर, पिस्ते, डिंक, उबदार शाली, गालिचे, सिल्क साठी प्रसिद्ध असून लोखंड शिसे, मीठ, सोने, तांबे आणि स्फटिक येथे मोठ्या प्रमाणावर मिळतात. मेषेद ही या भागाची राजधानी असून येथून गालिचे, चामडे, अफू, इमारती लाकूड, कापूस, सिल्क, नीलमणी यांची निर्यात होते.