सॅमसंग गॅलेक्सी ए २१ ‘सिम्पल एससीव्ही ४ जी’ जपान मध्ये गुपचूप लाँच
कोरियन कंपनी सॅमसंगने त्यांचा नवा गॅलेक्सी ए २१ सिरीज मधील स्मार्टफोन सिम्पल एससीव्ही ४ जी नावाने जपान मध्ये गुपचूप लाँच केला आहे. हा फोन कदाचित जपान बाहेर लाँच होणार नाही असेही सांगितले जात आहे.
हा फोन ए २१ स्मार्टफोनचे नवे व्हेरीयंट आहे. विशेष म्हणजे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असलेला हा फोन पाण्यात सुद्धा चालणार आहे. या फोनसाठी ५.८ इंची वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला गेला आहे. टीएफटी स्क्रीन सह असलेल्या या फोनला ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा तर रिअरला १३ एमपीचा कॅमेरा आहे.
३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला गेला आहे. अँड्राईड ११ ओएस आहे. फिंगरप्रिंट सपोर्ट नाही मात्र फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. काळ्या आणि पांढऱ्या अश्या दोन रंगात तो उपलब्ध असून फोनची किंमत आहे फक्त १४ हजार.