अमेरिकेची जबाबी कारवाई, ठार झाला काबुल हल्ल्याचा मास्टरमाईंड

अफगाणिस्थानच्या काबुल विमानतळाबाहेर केल्या गेलेल्या आत्मघाती हल्ल्यात बळी गेलेल्या १३ अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला अमेरिकेने घेतला आहे. अफगाणीस्तानच्या नांगरहार प्रांतात अमेरिकेने ड्रोनने केलेल्या जबाबी हल्ल्यात आयएस के चा नेता आणि काबुल विमानतळ हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार झाल्याचे पेंटागॉनने शनिवारी सकाळी जाहीर केले. काबुल विमानतळ बाहेरच्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेक खुरासान संघटनेने स्वीकारल्यावर ही कारवाई झाली आहे,

आत्मघाती स्फोटात अमेरिकेचे १३ नौसैनिक बळी पडल्यावर जबाबी कारवाई साठी अमेरिकावर दबाव होता. अध्यक्ष जो बायडेन यांनी याचा बदला घेतला जाईल, हुडकून हुडकून दहशतवाद्यांना ठार केले जाईल, या हल्ल्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असे जाहीर केले होते. आयएस के ने केलेल्या या हल्ल्यात १७० लोक ठार तर १२७६ जखमी झाल्याचे समजते. मृतात अमेरिकेचे १३ तर ब्रिटनचे दोन सैनिक आहेत.

न्युयॉर्क टाईमच्या रिपोर्ट नुसार अमेरिकी मानवरहित ड्रोननी नांगरहार प्रांतात हल्ले करून लक्ष्य संपविले असल्याचे पेंटागॉन ने जाहीर केल्याचे म्हटले असून अफगाणीस्थान मधील अमेरिकन लोकांना काबुल विमानतळापासून दूर राहण्याचे आदेश दिले गेल्याचे सांगितले आहे. कारण याच प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ शकतो अशी शक्यता आहे.