EPFO विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज


नवी दिल्ली – आपण कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असल्यास दरमहा मिळणाऱ्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. जर तुमच्याही महिन्याच्या पगारातून अशा प्रकारे पैसे कापले जात असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. खातेधारकांना या ईपीएफओ योजनेत विमा संरक्षणाची सुविधा प्राप्त होते. त्यांना कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI विमा संरक्षण) मार्फत ही सुविधा मिळते. जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण या योजनेचा लाभ घेणाऱ्या नामनिर्देशित व्यक्तीला मिळू शकते. यापूर्वी 6 लाख रुपये एवढी यासाठीची मर्यादा होती, पण ती विमा रक्कम आता सरकारने 7 लाख एवढी केली आहे.

EPFO विमा पॅालिसीसाठी असलेले नवीन नियम
देशातील सरकार संचलित ईपीएफओ (EPFO) ही एक कर्मचारी भविष्य निधी संघटना असून ही संघटना कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाची सुविधा देते. जीवन विमा डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत समाविष्ट असलेली योजना आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली होती. विमा रक्कमेची किंमत त्या वेळेस 6 लाख होती. आता मात्र या विम्याच्या रक्कमेत 1 लाखाची वाढ करुन 7 लाख करण्यात आली आहे.

ज्यांनी या विमा पॅालिसीअंतर्गत लाभ मिळवला आहे, त्यांना कोणत्याही वेगळ्या प्रकारचा पीएफ हफ्ता भरावा लागत नाही. या विमा योजनेअंतर्गत, खातेदाराच्या मृत्यूनंतर किंवा अपंगत्वानंतर, त्याच्या पत्नी/पती किंवा आईला 25 वर्षापर्यंतच्या मुदतीत दैनंदिन वेतनातून 90 टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दरमहा प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्याला या योजनेचा फायदा मुलीच्या लग्नाच्या वेळीही होऊ शकतो.

या योजनेसाठी अशा प्रकारे कराल अर्ज

  • सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत संकेतस्थळा भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तेथे उपलब्ध असलेल्या ‘Services’ या पर्यायावर निवडावा लागेल.
  • पुढे ‘For Employees’ पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर आपल्यासमोर ‘E-Sewa Portal’ हे उघडलेले दिसेल. त्यात समोर आलेल्या ‘Manage’ पर्यायामधील E-Nomination या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • पुढे समोर आलेल्या Yes पर्यायावर क्लिक करून ‘Add Family Details’ या पर्यायावर जावे.
  • समोर नमूद केलेले Nomination Details वर जाऊन पैशासंबंधीची व इतर वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर ‘Save EPF Nomination’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘E-sign’ मध्ये आपला नंबर नोंद असल्यास आपल्याला एक OTP प्राप्त येईल.
  • तो OTP भरल्यानंतर आधार कार्ड वरील 16 अंक तिथे टाकावे लागतील. अशा प्रकारे आपला नंबर रजिस्टर होऊन आपले तयार प्रोफाईल ओपन झालेले दिसेल.