‘चेहरे’ साठी अमिताभ बच्चन यांनी विना मानधन केले काम

निर्माते आनंद पंडित यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने ‘पिपिंग मून’ला दिलेल्या मुलाखतीत पंडित यांनी ‘ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी एक पैसाही मानधन घेतले नाही. उलट आंतरराष्ट्रीय शुटींगच्या वेळी येताना चार्टर फ्लाईटचा खर्च सुद्धा त्यानीच केला असा खुलासा केला आहे. बिग बी पूर्णपणे प्रोफेशनल आहेत आणि सेटवर येताना स्वतःचा खर्च स्वतः करतात असेही ते म्हणाले.

या चित्रपटाची कथा अमिताभ बच्चन यांना फारच आवडली आणि म्हणून त्यांनी विना मानधन काम करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात आहे. त्यामुळे टॅक्स बुक भरताना अडचण नको म्हणून अमिताभ यांच्या नावासमोर ‘फ्रेंडली अॅपिअरन्स’ असे लिहिण्याचा निर्णय घेतला गेला. या चित्रपटात बिग बी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लेखक रूमी जाफरी म्हणाले अमिताभ यांचे नाव फायनल झाल्यावर दुसऱ्या भूमिकेसाठी इमरान हाश्मीचा विचार केला. मी कधीच त्याच्याबरोबर काम केले नव्हते पण माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगले काम त्याने केले आहे. या चित्रपटात रिया चक्रवर्ती हिची सुद्धा भूमिका आहे.