11 वर्षांनंतर पुन्हा एकदा विवाहबद्ध झाले ‘जयकांत शिक्रे’!


रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अभिनेते प्रकाश राज हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. प्रकाश राज यांनी आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे.

11 वर्षांपूर्वी पोनी वर्माशी प्रकाश राज हे विवाहबद्ध झाले होते. पोनी वर्मा ही प्रकाश राज यांच्या पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाला नुकेतेच 11 वर्षे पूर्ण झाल्याने एका अनोख्या अंदाजात हा दिवस त्यांनी साजरा केला आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतेच काही फोटो प्रकाश राज यांनी शेअर केले आहेत. या फोटोत प्रकाश त्यांची पत्नी पोनी वर्मा आणि मुलगा दिसत आहे. यात त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केल्याचे दिसत आहे. एका फोटोत प्रकाश त्यांच्या पत्नीला प्रपोज करत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते किस करताना दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत ते संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. हे फोटो शेअर करत आमचा मुलगा वेदांतला आमचे लग्न पाहायचे होते, म्हणून आम्ही आज रात्री पुन्हा एकदा विवाहबद्ध झालो असल्याचे कॅप्शन प्रकाश राज यांनी दिले आहे.