या देशांनी अफगाणीसाठी उघडले दरवाजे तर या देशांनी बंद केले दरवाजे

तालिबानी सेनेने अफगाणीस्तान मधील महत्वाच्या ठिकाणांवर कब्जा केल्यामुळे अफगाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर देशाबाहेर पडण्यास सुरवात झाली असून त्यामुळे अफगाणी शरणार्थीचा मोठा प्रश्न जगासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे अनेक देशांनी त्यांची दारे बंद केली असून त्यातील बरेच देश पूर्वी अफगाणिस्थानचे मित्र देश आहेत.

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी जून मध्येच तालिबानकडे अफगाणिस्थानचे नियंत्रण गेल्यास देशाची सीमा सील केली जाईल अशी घोषणा केली होती. अर्थात तरीही सुमारे ३० लाख अफगाणी पाकिस्तान मध्ये घुसल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात पाकिस्तान आणि त्यांची आयएसआय तालिबानींना शस्त्रे. दारूगोळा, प्रशिक्षण आणि फंडिंग अशी मदत करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

तुर्कस्तानने अफगाणी नागरिकांना येण्यास बंदी केली असून सीमेवर भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. ताजिकिस्तानने सैनिकांसाठी अॅलर्ट घोषित केला आहे तर ऑस्ट्रियाने अफगाणी शरणार्थीना देशात घेण्यास नकार दिला आहे. स्वित्झर्लंडने शरणार्थीच्या रुपात दहशतवादी घुसू शकतील म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिला जाणार नाही असे सांगितले आहे तर रशियाने स्पष्ट नकार दिला आहे.

भारत अफगाणी नागरिकांना आश्रय देण्यात सर्वात पुढे असून अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इराणने आश्रय देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. भारत नेहमीच अफगाणिस्थान मध्ये शांतता राहावी याचा समर्थक राहिला आहे. अफगाणीस्थान मधून रोज विमानातून अफगाणी नागरिकांना भारतात आणले जात असून त्यासाठी सहा महिने वैध असलेला ई व्हिसा दिला जात आहे.