मस्क यांच्या स्टार लिंकसाठी १ लाखावर झाली प्री बुकिंग

एलोन मस्क यांच्या स्पेस एक्सची उपग्रह सेवा कंपनी स्टार लिंक ला १ लाख प्री बुकिंग मिळाले असल्याचे मस्क यांनी सोमवारी केलेल्या ट्विट सिरीज वरून स्पष्ट झाले आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार १४ देशात आत्ता पर्यंत सर्विस प्रोव्हायडर मिळाले असून अनेक देश परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. स्पेस इंडस्ट्री मध्ये एका नक्षत्र रुपात हजारो उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापन करून त्याच्या मदतीने इंटरनेट सेवा देण्याच्या उद्देहाने स्टार लिंकची स्थापना केली गेली आहे.

जुलै मधेच या सेवेसाठी ९० हजार ग्राहकांनी प्री बुकिंग केले होते आणि ऑगस्ट मध्ये नवे १० हजार ग्राहक मिळाले आहेत. स्टार लिंकने आत्तापर्यंत १८०० उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित केले असून २०२७ पर्यंत ४२ हजार उपग्रह स्थापित केले जाणार आहेत. अर्थ ओर्बिट सॅटेलाईट सेवेसाठी ५ लाख प्री बुकिंग आल्याचा दावा केला गेला आहे.

स्टार लिंकने आत्ता पर्यंत ब्रॉडबँडचा वेग घातला असून २०२० च्या अखेरीपासून भारतासह जगभरातील देशातून ९९ डॉलर्स भरून प्री बुकिंग घेण्याची सुरवात केली गेली होती. भारतात २०२२ पासून या उपग्रह माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे असे समजते.