राज्यपालांच्या हस्ते कोरोनाविषयक ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई : दृष्टिहीन व्यक्तींमध्ये कोरोना विषयावर जनजागृती करणाऱ्या ब्रेल लिपितील ‘कोविड – १९ बिमारी और इलाज’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

पुस्तकाचे लेखक, सर्पमित्र व स्काऊट गाईड जिल्हा आयुक्त भरत जोशी यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. यावेळी दृष्टिहीन व्यक्तींनी ब्रेल लिपितील पुस्तकांचे उतारे वाचून दाखविले.