राणेंच्या अटकेवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांची पहिली प्रतिक्रिया


नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना करण्यात आलेली अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ३०-४० गुन्हे मंत्र्यावर दाखल करणे हा काय प्रकार असल्याची विचारणा संबित पात्रा यांनी यावेळी केली.


वक्तव्य चुकले, असेल पण कारवाई चुकीची असे सांगताना संबित पात्रा यांनी शरजिल उस्मानचा दाखला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत रोज काय बोलतात. पण एक गुन्हा दाखल नसल्याचे सांगताना संबित पात्रा यांनी बदल्याच्या भावनेने राणेंवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे.