नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली एक महत्त्वपूर्ण माहिती


महाड – केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे अडचणीत सापडल्याची चिन्ह आहेत. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या राणे यांच्यावरील या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता एक महत्त्वपूर्ण माहिती नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. नारायण राणे यांचे ब्लड प्रेशर जास्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांची तपासणी करणारे डॉक्टर माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, नारायण राणेंना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. आता त्यांची ब्लड शुगर आम्हाला चेक करता आलेली नाही. परंतु, आम्ही ब्लड प्रेशर चेक केले असून राणेंचे बीपी वाढलेले आहे. ब्लड प्रेशर जास्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयात दाखल करून त्यांची ईसीजी तपासणी आणि पुढील उपचार करणे महत्त्वाचे आहे.