टायगर श्रॉफची अलिशान घर खरेदी

बॉलीवूड मध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेला आणि तरुणाईचा आयकॉन टायगर श्रॉफने मुंबईच्या अति महागड्या, पॉश भागात, खार वेस्ट मध्ये आठ बेडरूमचे अलिशान घर विकत घेतल्याची बातमी मागेच आली होती. या घराचे इंटिरीअरचे काम पूर्ण झाले असून टायगर त्याचे आई वडील आणि बहिण कृष्णा सह नव्या घरात राहायला गेला आहे. अरबी समुद्राचे सुंदर दर्शन होणाऱ्या रुस्तमजी पॅरामाउंट या इमारतीत हे घर असून घरात जिम, गेम रूम, डान्सिंग रूम अश्या अनेक सुविधा आहेत.

या अतिअलिशान कॉम्प्लेक्स मध्ये आर्टिफीशीयल रॉक क्लायबिंग, स्टार गेझिंग डेक एरिया असून अनेक सेलेब्रीटी येथे राहतात. राणी मुखर्जी, हार्दिक पांड्या, कुणाल पंड्या, दिशा पाटणी यांनी या सोसायटीत घर खरेदी करण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे.

टायगर पूर्वी कार्टर रोडवर भाड्याच्या घरात राहत होता. त्याचा बागी तीन लवकरच प्रदर्शित होत आहे. स्वातंत्रदिनी त्याच्या आवाजातील एक देशभक्ती गीत त्याने परफॉर्म केले होते आणि गायले होते. टायगरने त्याच्या अपकमिंग ‘गणपत’ चा टीझर नुसताच शेअर केला आहे.