
नवी दिल्ली – काल दिवसभरात देशात २५ हजार ७२ करोनाबाधितांची नोंद झाली असून ३८९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ४४ हजार १५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली असून आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ३३ हजार ९२४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या १५५ दिवसांत ही रुग्णसंख्या सर्वात कमी आहे.
काल दिवसभरात देशात २५ हजार कोरोनाबाधितांची नोंद, ३८९ मृत्यूची नोंद
दरम्यान, देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर असून विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९१ टक्क्यांवर आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात देशात २४ तासांत ७ लाख ९५ हजार ५४३ जणांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५८ कोटी २५ लाख ४९ हजार ५९५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
