टोकियो पॅरालंपिक स्पर्धेला २४ ऑगस्टपासून होणार सुरुवात; असे आहे वेळापत्रक


नवी दिल्ली – यशस्वीरित्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यानंतर टोकियोत आता पॅरालंपिक स्पर्धा रंगणार आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. टोकियो पॅरालंपिक स्पर्धेला २४ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ५ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील वेगवेगळ्या प्रकारात ५४ भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आहे.

१९६० मध्ये पॅरालंपिक खेळाची सुरुवात झाली होती. भारताने तेल अवीव पॅरालंपिक १९६८ मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यानंतर १९८४ पासून भारत या स्पर्धेत सलग भाग घेत आहे. आतापर्यंत भारताने ११ पॅरालंपिक खेळात भाग घेतला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदक पटकावले आहेत. यातील १० पदके भारताने अ‍ॅथलेटिक्स प्रकारात मिळवली आहेत.

  • टेबल टेनिस (२५ ऑगस्ट)
    व्यक्तिगत सी ३- सोनलबेन मुधभाई पटेल
    व्यक्तिगत सी ४- भाविना हसमुखभाई पटेल
  • तिरंदाजी (२७ ऑगस्ट)
    पुरुष रिकर्व व्यक्तिगत ओपन- हरविंदर सिंह, विवेक चिकारा
    पुरुष कंपाउंड व्यक्तिगत ओपन- राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
    महिला कंपाउंड व्यक्तिगत ओपन- ज्योती बालियान
    महिला मिश्र टीम ओपन- ज्योति बालियान आणि टीबीसी
  • पॉवरलिफ्टिंग (२७ ऑगस्ट)
    पुरुष- ६५ किग्रा कॅटेगरी- जयदीप देसवाल
    महिला- ५० किग्रा कॅटगरी- सकीना खातून
  • स्विमिंग (२७ ऑगस्ट)
    २०० व्यक्तिगत मिडले एसएम ७ – सुयश जाधव
  • अ‍ॅथलेटिक्स (२८ ऑगस्ट)
    पुरुष भालाफेक एफ ५७- रंजीत भाटी
  • अ‍ॅथलेटिक्स (२९ ऑगस्ट)
    पुरुष थाली फेक एफ ५२- विनोद कुमार
    पुरुष उंच उडी टी ४७- निशाद कुमार, राम पाल
  • अ‍ॅथलेटिक्स (३० ऑगस्ट)
    पुरुष थाली फेक एफ ५६- योगेश कथुनिया
    पुरुष भालाफेक एफ ४६- सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया
    पुरुष भालाफेक एफ ६४- सुमित अंटिल, संदीप चौधरी
  • नेमबाजी (३० ऑगस्ट)
    पुरुष आर १- १० मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच १- स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
    महिला आर २- १० मीटर एयर रायफल एसएच १- अवनी लेखारा
  • नेमबाजी (३१ ऑगस्ट)
    पुरुष पी १- १० मीटर एयर पिस्टल एसएच १- मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
    महिला पी २- १० मीटर एयर पिस्टल एसएच १- रुबिना फ्रांसिस
  • अ‍ॅथलेटिक्स (३१ ऑगस्ट)
    पुरुष उंच उडी- शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी
    महिला १०० मीटर टी १३- सिमरन
    महिला शॉटपुट एफ ३४- भाग्यश्री माधवराव जाधव
  • बॅडमिंटन (१ सप्टेंबर)
    पुरुष एकेरी (एसएल ३)- प्रमोद भगत, मनोज सरकार
    महिला एकेरी (एसयू ५)- पलक कोहली
    मिश्र दुहेरी (एसएल ३) (एसयू५)- प्रमोद भगत आणि पलक कोहली
  • अ‍ॅथलेटिक्स (१ सप्टेंबर)
    पुरुष क्लब थ्रो एफ ५१- धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा
  • बॅडमिंटन (२ सप्टेंबर)
    पुरुष एकेरी (एसएल ४)- सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन
    पुरुष एकेरी (एसएस ६)- कृष्णा नागर
    महिला एकेरी (एसएल ४)- पारुल परमार
    महिला मिश्र (एसएल ३) (एसयू ५)- पारुल परमार आणि पलक कोहली
  • पॅरा कॅनॉइंग (२ सप्टेंबर)
    महिला वीएल 2- प्राची यादव
  • तायक्वांडो (२ सप्टेंबर )
    महिला ४४ – ४९ किग्रा- अरुणा तंवर
  • नेमबाजी (२ सप्टेंबर)
    मिक्स्ड पी ३- २५ मीटर पिस्टल एसएच १- आकाश आणि राहूल जाखड
  • नेमबाजी (३ सप्टेंबर)
    पुरुष आर ७- ५० मीटर राइफल ३ पोझिशन एसएच १- दीपक सैनी
    महिला राउंड ८- ५० मीटर राइफल ३ पोझिशन एसएच १- अवनी लेखारा
  • स्विमिंग (३ सप्टेंबर)
    ३५० मीटर बटरफ्लाई एस ७- सुयश जाधव, निरंजन मुकुंदन
  • अ‍ॅथलेटिक्स (३ सप्टेंबर)
    पुरुष उंच उडी टी ६४- प्रवीण कुमार
    पुरुष भालाफेक एफ ५४- टेक चंद
    पुरुष शॉटपुट एफ ५७- सोमन राणा
    महिला क्लब थ्रो एफ ५७- एकता भ्यान, कशिश लाकडा
  • नेमबाजी (४ सप्टेंबर)
    मिक्स्ड राउंड ३- १० मीटर एयर रायफल प्रोन एसएच १- दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा
    मिक्स्ड पी ४- ५० मीटर पिस्टल एसएच १- आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज
  • अ‍ॅथलेटिक्स (४ सप्टेंबर)
    पुरुष भालाफेक थ्रो एफ ४१- नवदीप सिंह
  • नेमबाजी (५ सप्टेंबर)
    मिक्स्ड राउंड ६ – ५० मीटर राइफल प्रोन एसएच १- दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू