ट्रोलर्सला स्वरा भास्करचे बेधडक उत्तर


गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच चर्चेत आहे. तिला सोशल मीडियावर स्वराने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तिने तालिबानशी हिंदुत्ववाद्यांची तुलना केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी #ArrestSwaraBhasker हा ट्रेंड सुरू केला होता. तालिबानशी हिंदुत्ववाद्यांची तुलना करणारे ट्वीट आता स्वराला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण देशभरात विविध ठिकाणी स्वरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता स्वराने तिच्या इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिचे मत मांडले आहे.


स्वराने शनिवारी तिच्या इनस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत तिचे मत मांडले आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, सोशल मीडिया हे एक व्हर्चुअल, सार्वजनिक ठिकाण आहे. जसे रस्त्यावर रेस्टॉरंट आहेत. पण जसा शिष्टाचार आणि सभ्यता सार्वजनिक ठिकाणी बाळगली जाते, तसे सोशल मीडियावर कोणी पाळत नाहीत. मी फक्त एका फुलाचे चित्र पण पोस्ट करू शकत नाही आणि जर पोस्ट केले तर त्याचे कनेक्शन वीर दी वेडिंगच्या हस्तमैथुन दृश्याशी केले जाते.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वराने पुढे लिहिले की, हे अत्यंत चुकीचे, अश्लील आणि सायबर लैंगिक छळ स्वरुपाचे आहे. मला असे वाटत की याला कोणीही बळी पडू नये आणि ऑनलाइन ट्रोलिंग करुन मला कोणी ही रोखू शकत नाही. या व्हर्चुअल पब्लिक प्लेसला नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरू शकत नाही. स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय होत आहे. नेटकरी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. स्वराने यापूर्वी देखील ट्रोलर्सना चोख उत्तर दिले असले तरी तिला ते कठीण असते, असे तिने संगितले. ‘इ-टाइम्स’शी बोलताना तिने सांगितले होते की, एखाद्या सामाजिक समस्येबद्दल तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा दररोज सकारात्मकतेने ट्रोलर्सचा सामना करणे कठीण असते.