कोरोना लसीच्या बूस्टर डोसची तुर्तास गरज नाही : व्ही. के. पॉल


नवी दिल्ली – केंद्र सरकारने अद्याप कोरोना लसीच्या बूस्टर डोसचा विचार केला नसल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी दिली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा लसीकरणावरील हवाला देऊन सांगितले की, या संदर्भात अशी कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला व्ही के पॉल यांनी सांगितले, की बूस्टर डोसची वेळ आणि आवश्यकता यामागील विज्ञान अजूनही विकसित होत आहे. कंपन्यांनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे आहे. बारकाईने यावर लक्ष ठेवले जात असून संशोधन केले जात आहे. ते पुढे म्हणाले की लसीचे दोन डोस भारतातील प्रौढ लोकसंख्येला देऊन लसीकरण करणे ही आतापर्यंतची मोठी चिंता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना पॉल म्हणाले की, जगातील काही देशांनी बूस्टर डोस देऊन लसीकरण सुरू केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत त्यांनी असेही म्हटले आहे की या विषयावर अद्याप कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.