आला किंगकाँग ७ स्मार्टफोन

किंगकाँग नाव ऐकले की नजरेसमोर येतो किंगकाँग हा महाबलाढ्य, शक्तीशाली माणूस. त्याच्याच नावावरून क्युबोटने हायली कॉम्पिटिटीव्ह स्पेसिफिकेशन चा नवीन किंगकाँग ७ स्मार्टफोन बाजारात आणला असून हा फोन पाण्यात खराब होणार नाही किंवा गरम सुद्धा होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

या फोनसाठी ६.३६ इंची फुल एचडी डिस्प्ले, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ५००० एएमएच बॅटरी दिली गेली असून एकदा चार्ज केल्यावर हा फोन २ दिवस चालेल असे कंपनीचे म्हणणे आहे. फोनसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ६४ एमपी, १६ एमपी अल्ट्रा वाईड तर ५ एमपीचे मॅक्रो लेन्स दिले गेले आहे. ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. सर्व कॅमेरे उत्तम प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतात.

२३ ऑगस्टला अलीएक्सप्रेसच्या माध्यमातून हा फोन १७९.९९ डॉलर्स म्हणजे १३,३३१ रुपयात  मिळू शकणार आहे. फोनची मूळ किंमत २९९.९९ डॉलर्स म्हणजे २२,२८६ रुपये आहे. या संदर्भात अधिक माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल.