लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे TOP 5मध्ये


नवी दिल्ली – नुकताच देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपशासित राज्यातील आहेत. २९ टक्के लोकांची पसंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आहे. तर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचे नाव टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. इंडिया टुडेने ‘मूड ऑफ द नेशन’च्या अंतर्गत केलेल्या या सर्व्हेत लोकांची मत जाणून घेतल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे नाव सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाचव्या क्रमांकावर आहेत. भाजपशासित राज्यातील दोन मुख्यमंत्र्यांचा या यादीत समावेश आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव आहे. या यादीत दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव आहे.

तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे पहिल्या क्रमांकावर असून ४२ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. ३८ टक्के लोकांची ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांना पसंती आहे. तिसऱ्या स्थानावर केरळ मुख्यमंत्री पी विजयन असून ३५ टक्के लोकांची त्यांना पसंती आहे. ३१ टक्के लोकांची पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना असून ते चौथ्या स्थानाववर आहे. ममता बॅनर्जी पाचव्या, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सहाव्या, योगी आदित्यनाथ सातव्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दहाव्या, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल अकराव्या स्थानावर आहेत.